मुस्लिम महिलेला विमानतळावर चौकशीत दाखवावे लागले रक्ताने माखलेले सॅनिटेरी पॅड!

मी फक्त मुस्लिम आहे म्हणून मला थांबवण्यात आलं का ?,

अमेरिका, 25 आॅगस्ट : अमेरिकन नागरिक जैनब मर्चेट सप्टेंबर 2016 पासून विमानतळावरून अनेक वेळा तपासणीला सामोर गेली. ज्या ज्या वेळी तिची चौकशी केली त्या त्यावेळी तिला अपमानस्पद वागणूक दिली गेली. यावेळी तर जैनबला मासिक पाळीच्या दरम्यान, वापरात असलेले सॅनिटेरी पॅड दाखवण्यास सांगितले. या प्रकारामुळे अमेरिकेत संताप व्यक्त होत आहे. 27 वर्षी जैनबने 'वाशिंग्टन पोस्ट' मध्ये लेख लिहिलाय. यात तिने विमानतळावर कशा प्रकारे माझी चौकशी करण्यात आली याची हकिकत सांगितली आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी एकदा लॅपटाॅपला स्टिकर आहे म्हणून चौकशी केली तर एकदा श्वान पथकाला चौकशीला बोलावले होते.

हॉवर्डमधून पदवीधर झालेली जैनबही जेडआर स्टुडिओजची सीईओ आहे. ही एक राजकीय आणि सांस्कृतिक मोठी वेबसाईट आहे. तीन मुलांची आई असलेल्या जैनबवर येथील पोलीस नजर ठेवून असतात. एवढंच नाहीतर फेडरल वॉचच्या यादीतही तिचा समावेश केलाय. यावेळी जैनब विमानतळावर पोहोचली तेव्हा तिची तपासणी करण्यात आली. टीएसएचे अधिकारींना तिने सांगितलं की, मला मासिक पाळी असून पॅड लावलेले आहे. तेव्हा अधिकाऱ्यांनी तिला पुरावा दाखवण्यासाठी सांगितलं. तिने विनंती केली तरी अधिकाऱ्यांनी तिचं ऐकलं नाही अखेर तिला नाईलाजाने सॅनिटेरी पॅड काढून दाखवावा लागला. जैनबने huffpost दिलेल्या माहितीनुसार, चौकशीनंतर तिने अधिकाऱ्ायंना याबददल जबाब विचारला. आणि तुमचे नाव आणि बॅच क्रमांक सांगा अशी मागणी केली तर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. मी फक्त मुस्लिम आहे म्हणून मला थांबवण्यात आलं का ?, माझे कुटुंब एकदा इराणाला गेले होते म्हणून माझी चौकशी केली का ? असा संतप्त सवालही तिने उपस्थितीत केला. VIDEO : 'डब्बू अंकल' इज बॅक, मिथुनच्या गाण्यावर तुफान डान्स

Trending Now