मोहिम फत्ते! थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका

थायलंडमधल्या टॅम लुंग गुहेत अडकलेल्या सर्व मुलांना आज मदत पथकाने सुरक्षित बाहेर काढलं. आज सकाळी 10 वाजता सुरू झालेली मोहिम सायंकाळी संपली

ता.10 जुलै : थायलंडमधल्या टॅम लुंग गुहेत अडकलेल्या सर्व मुलांना आज मदत पथकाने सुरक्षित बाहेर काढलं. आज सकाळी 10 वाजता सुरू झालेली मोहिम सायंकाळी संपली आणि गेली 16 दिवस जीवाचं रान करणाऱ्या एक हजार जणांच्या मदत पथकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. 16 पाणबुड्यांच्या टिमने आज दुपारी तीन मुलांना बाहेर काढलं आणि नंतर एक मुलगा आणि कोच सुखरूप बाहेर आला. ऑक्सिजनची कमतरता, अरूंद मार्ग आणि वाढत जाणारं पाणी अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मदत पथकानं ही मोहिम फत्ते केलीय.

Thailand Cave Rescue : गुहेत अडकलेल्या 6 मुलांना सुरक्षित बाहेर काढले!

आता गुहेतच 'त्या' मुलांना दिलं जाणार पोहण्याचं प्रशिक्षण

उत्तर थायलंडमधील टॅम लुंग गुहेत गेल्या आठवडाभरापासून फुटबॉल खेळाडू असलेली ही 12 मुले आणि त्यांचा कोच अडकले आहेत. बचाव पथकात थायलंड नौदलाचे 5 आणि अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, यूकेसह अन्य 10 देशांचे तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. रविवारी 6 मुलांना गुहेतून सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांना यश आलं होतं. त्यांना तात्काळ रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी जवळच एक अस्थायी रुग्णालय उभारण्यात आलंय. गुहेतून बाहेर पडण्याची जागा छोटी असल्यामुळे गुहेत अडकलेल्या इतर 7 जणांना काढण्यासाठी आणखी 2 - 4 दिवसांचा अवधी लागू शकतो, असं बचाव पथकाच्या एका अधिकाऱ्यांने स्पष्ट केलंय.

Thai Cave Rescue: मुलांना वाचवताना माजी नेव्ही सिल कमांडोचा मृत्यू

थायलंडः गुफेत अडकलेल्या मुलांनी असा साजरा केला वाढदिवस

'वाईल्ड बोअर' नामक ही फुटबॉल टीम २३ जून रोजी गुहा पाहण्यासाठी गेली होती. गुहेत फार आत गेल्यावर अचानक पावसाचा जोर वाढला आणि त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं. मुसळधार पाऊसामुळे गुहेत मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असून, गडद अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे येत असले तरी, मुलांना अधिकाधिक मानसिक बळ देण्याचे सर्वपरिने प्रयत्न केले जात आहे. दरम्यानच्या काळात बचाव पथकातील माजी अधिकारी सामन कुनोंट यांचा गुहेमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. आम्ही हे कार्य तडीस नेऊ याचा आम्हाला विश्वास आहे असे चिआंग राय प्रांताचे गव्हर्नर नारोंगसक ओसातानाकोर्न यांनी स्पष्ट केलंय. 

Trending Now