VIDEO : लोअर परळ फ्लायओव्हर बंद, प्रवाशांची 'तोबा' गर्दी

दक्षिण मुंबई भागातला लोअर परळ फ्लायओव्हर बंद केल्यामुळे स्थानकाबाहेर प्रचंड गर्दी झालीये.

24 जुलै : दक्षिण मुंबई भागातला लोअर परळ फ्लायओव्हर बंद केल्यामुळे स्थानकाबाहेर प्रचंड गर्दी झालीये. कारण पादचाऱ्यांसाठीही पूल बंद करण्यात आलाय. त्यामुळे कमला मिलला जाणारे किंवा चिंचपोकळीच्या दिशेनं जाणारे, यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा मोठा ताफाच या लोअर परळमध्ये जमा झाला आहे असं म्हटलं तर वावग वाटणार नाही. एवढी मोठी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसही मोठे प्रयत्न करत आहे. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना इथे घडायला नको, एवढीच अपेक्षा आहे.

Trending Now