JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google Photos वरून डिलीट झालेले फोटो-व्हिडीओ कसे मिळवाल? वापरा गुगलची जबरदस्त ट्रीक!

Google Photos वरून डिलीट झालेले फोटो-व्हिडीओ कसे मिळवाल? वापरा गुगलची जबरदस्त ट्रीक!

आपला स्मार्टफोनमध्ये (Smartphones) अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा साठा असतो. सध्या मोबाइलमध्ये अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरे असल्यानं फोटो काढण्याचं प्रमाणही वाढलं आहे. अशावेळी स्टोरेज राहावं याकरता आपण गुगल फोटोजचा वापर करतो. पण त्यातूनही तुमचा डेटा डिलीट झाला तर?

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 एप्रिल:  स्मार्टफोनमध्ये (Smartphones) अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा साठा असतो. सध्या मोबाइलमध्ये अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरा असल्यानं फोटो काढण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळं मोबाइलमध्ये अनेक आठवणींशी संबंधित फोटो (Photo) आणि व्हिडीओचा (Video) खजिना असतो. मोबाइलची साठवण क्षमता कितीही जास्त असली तरी त्याला मर्यादा असते त्यामुळे हा सगळा खजिना गुगल फोटोजवर (Google Photos) साठवला जातो. मात्र चुकून गूगल फोटोजवरून एखादा फोटो किंवा व्हिडिओ डिलीट झाला, तर आपल्याला हळहळ वाटते पण हा फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा मिळवता येतो. वेबवरदेखील आपण हे फोटो, व्हिडीओ मिळवू शकतो. त्यासाठी एक साधी सोपी पध्दत आहे. अँड्रॉइडमध्ये फोटो किंवा व्हिडीओ रिस्टोअर कसे करावेत? -सर्वांत आधी आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनमधील गुगल सेक्शनमधील गुगल फोटोज ओपन करा. यानंतर, डावीकडील हॅम्बर्गर आयकॉनवर टॅप करा आणि ट्रॅश ऑप्शन निवडा. - यानंतर, इथं डिलीट केलेले फोटो आणि व्हिडीओ दिसतील. जो फोटो तुम्हाला पुन्हा स्टोअर करायचा आहे, त्यावर लॉंग प्रेस करा आणि रिस्टोअर ऑप्शनवर टॅप करा. पुन्हा गूगल फोटोजवर परत जाल तेव्हा तो फोटो पुन्हा दिसेल. आयफोनमध्ये फोटो कसे रिस्टोअर करावेत? - आयफोन वापरत असाल तर, इथंही गुगल फोटोजमधून डिलीट केलेले फोटो पुन्हा मिळवता येतात. - गुगल फोटो उघडल्यानंतर, डावीकडे सर्वात वर असलेल्या हॅम्बर्गर आयकॉनवर टॅप करा आणि ‘बिन’ निवडा. - त्यानंतर, पुन्हा डाव्या बाजूला सर्वात वरती असलेल्या तीन आडव्या रेषांच्या आयकॉनवर टॅप करा आणि नंतर सिलेक्टवर टॅप करा. - फोटोंच्या यादीतून आपला आवडता फोटो किंवा व्हिडिओ रिस्टोअर करा. तो फोटो तुम्हाला पुन्हा लायब्ररीत दिसेल. -वेबवरील गुगल फोटोवरुन डिलीट केलेले फोटो रिस्टोअर कसे करावेत : लॅपटॉप किंवा पीसीवर ब्राउझरवर https://photos.google.com/ लिंकवर जाऊन गूगल फोटो उघडा. त्यानंतर डाव्या बाजूला वर असलेल्या हॅमबर्गर आयकॉनवर क्लिक करा आणि ट्रॅश ऑप्शन निवडा. तिथं डिलीट केलेले फोटो दिसतील, जे फोटो हवे आहेत, ते सिलेक्ट करून उजवीकडे वरच्या बाजूला असलेल्या रिस्टोअरचं बटण दिसेल, त्यावर क्लिक करून फोटो रिस्टोअर करता येतील. डिलीट केलेले फोटो किंवा व्हिडिओ 60 दिवसच ट्रॅशमध्ये असतात, त्यानंतर तिथूनही ते डिलीट होतात, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. फोटो किंवा व्हिडिओ ट्रॅशमधून डिलीट झाल्यानंतर परत मिळवता येऊ शकत नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या