शाओमीच्या 'रेडमी नोट 5 प्रो'च्या किंमतीत वाढ

दरम्यान, रेडमी नोट 5 प्रो 6GB रॅम व्हेरिएंटच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Sachin Salve
30 एप्रिल : शाओमीचा रेडमी नोट 5 प्रो हा फोन खरेदी करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी आहे. या फोनची किंमत वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या फोनचं 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जन, जे 13 हजार 999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आलं होतं, त्यासाठी आता 14 हजार 999 रुपये मोजावे लागतील.किंमत वाढवण्याचं कारण काय?शाओमीने ही किंमत वाढवण्यामागचं कारणही सांगितलं आहे. PCBA इम्पोर्ट ड्युटीत झालेले बदल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचं मूल्य घसरल्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, रेडमी नोट 5 प्रो 6GB रॅम व्हेरिएंटच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.फेब्रुवारीत 'रेडमी नोट 5 प्रो' स्मार्टफोनचे एकूण दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले होते. यामध्ये 13 हजार 999 रुपये किंमतीचा 4 जीबी व्हेरिएंट आणि 16 हजार 999 रुपये किंमतीचा 6 जीबी व्हेरिएंट अशा दोन व्हेरिएंटचा समावेश आहे.'रेडमी नोट 5 प्रो'चे निवडक फीचर्स :5.9 इंच एचडी स्क्रीन (1080×2160 पिक्सेल रिझॉल्युशन)ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट12 मेगापिक्सेल आणि 5 मेगापिक्सेलचे दोन रिअर कॅमेरेब्युटिफाय 4.0, पोट्रेट मोडचेही कॅमेरात फीचर्स20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा4000 mAh क्षमतेची बॅटरी

Trending Now