व्हाॅटस्अॅपवरून पुढच्या आठवड्यापासून पाठवू शकता पैसे !

संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित सुरू झाल्यानंतर एसबीआय बँक पण यामध्ये सहभागी होणार आहे.

Sachin Salve
नवी दिल्ली, 30 मे : आत्तापर्यंत आपण पेटीएम, मोबिक्विक, गुगल वरून पैसे ट्रान्सफर करायचो.  पण आता आपण चक्क व्हाॅटस्अॅपवरून पैसे ट्रान्सफर करू शकणार आहोत. पुढील आठवड्यापासून व्हाॅटस्अॅप 'मनी ट्रान्सफर' सेवा सुरू करत आसून, भारतातील डिजीटल मार्केटमधील अन्य कंपन्याना टक्कर देण्यास व्हाॅटस्अॅप आता तयार झाले आहे.व्हाॅटस्अॅप आपल्या 'मनी ट्रान्सफर' सेवेसाठी HDFC, ICICI आणि एक्सिस बँकेसोबत पार्टनरशीप करणार असल्यामुळे ग्राहकांचे पैसे सुरक्षित ट्रान्सफर केल्या जाणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित सुरू झाल्यानंतर  एसबीआय बँक पण यामध्ये सहभागी होणार आहे.यावर्षी फेब्रुवारी महिन्यात व्हाॅटस्अॅपने 'मनी ट्रान्सफर'चे पायलट व्हर्जन लाँच केले होते, याला 10 लाख युजर्सने प्रतिसाद दिला होता. कंपनीला विश्वास आहे भारतात त्यांचे युजर्स नक्किच यापेक्षा जास्त असतील, कारण भारतात 20 करोड पेक्षा जास्त लोकं व्हाॅटस्अॅपचा वापर करत आहेत.

क्रेडिट सुइस च्या एका अहवालानुसार भारतात डिजीटल पेंमेट इंडस्ट्री सध्याची स्थिती 200 अरब डॉलरची असून 2023 पर्यंत हाच आकडा पाचपट वाढणार असून 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Trending Now