सावधान! धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम

Whatsapp त्याच्या फिचरमध्ये एक मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअॅपचा सर्वात जास्त वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा बदल जगातील सर्वात महत्वाचा बदल असणार आहे. कारण कंपनीने केलेले हा बदलामुळे त्यांचा व्हॉट्सअॅप डेटा धोक्यात येणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप नेमके काय बदरल करणार ते पाहूया. खरंतर, व्हॉट्सअॅप चॅक बॅकअपच्या पद्धतीत मोठा बदल करणार आहे. जिथे आधी आपल्याला WhatsAppचा बॅकअप घेण्यासाठी गुगल ड्राईव्हचा वापर करावा लागायचा तिथे आता बॅकअप साठी गुगलचा वापर करण्याची गरज लागणार नाही. व्हॉट्सअॅपची मुळ कंपनी फेसबुक आणि गुगलमध्ये एक डील झाली आहे. त्यानुसार, व्हॉट्सअॅप आणि गुगलमध्ये एक अॅग्रीमेंट झालं आहे. त्यानुसार 12 नोव्हेंबरला बॅकअपसाठी गुगल क्लाऊड स्टोरेज त्याची जागा देणार नाही. त्यानंतर व्हॉट्सअॅप मीडिया, टेक्स्ट आणि मेमोसह प्रत्येक डेटा हा गुगल अकाऊंटवर आपोआप बॅकअप होईल.

नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट होण्यासोबतच जुने सगळे बॅकअप (फोटो, व्हिडियो, चॅट )ज्यांना वर्षभर अपडेट केलं नाही गेलं त्यांना डिलीट केलं जाईल. त्यामुळे 12 नोव्हेंबरच्या आधी हे सुनिश्चित करून घ्या की तुमचा सगळा महत्त्वाचा डेटा हा बॅकअप झाला आहे. आपला महत्त्वाचा डेटा बॅकअप करताना तुमचा फोन वायफायशी कनेक्ट असला पाहिजे. कारण बॅकअपच्या फाईल्सची साइज ही वेगळी असते. सगळ्यात आधी आपला फोनमध्ये गुगल अकाऊंट एक्टिवेट करा. त्यानंतर त्यात गुगल ड्राइव्ह सेटअप INSTALL करा. त्यानंतर बाजूला दिलेल्या डॉटवर जा, तुमच्यासमोर MENU ओपन होईल. त्यानंतर सेटिंग्समध्ये जा आणि CHATवर जाऊन तुमचा डेटा बॅकअपकरून घ्या.

Trending Now