बजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन

विवोने आपला नवीन स्मार्टफोन Vivo V9 Youth भारतामध्ये लॉंच केला आहे. याचा फुल व्ह्यू डिस्प्ले आहे. या मोबाईलची किंमत भारतामध्ये १८,९९० रुपये असणार आहे.

Sonali Deshpande
21 एप्रिल : विवोने आपला नवीन स्मार्टफोन Vivo V9 Youth  भारतामध्ये लॉंच केला आहे. याचा फुल व्ह्यू डिस्प्ले आहे. या मोबाईलची  किंमत भारतामध्ये १८,९९० रुपये असणार आहे. तसेच हा फोन ब्लॅक आणि गोल्ड रंगामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.विवोच्या या नवीन फोनचा डिस्प्ले ६.३ इंच फुल HD+ (1080x2280 पिक्सल) डिस्प्ले आहे. आणि याचा अस्पेक्ट रेशो 19:९ आहे. यामध्ये ४ जीबी रॅम व ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज असेल, ज्याला २५६ जीबीपर्यन्त वाढवता येऊ शकते.  आणि यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर आहे .एंड्रॉयड 8.1 ओरियो बेस्ड फनटच OS 4.0 वर हा काम करतो.याचा समोरील कॅमेरा हा १६ मेगा पिक्सेलचा आहे. सोबतच यामध्ये AI फेस ब्युटी फीचर आहे. सेल्फी  शौकीन असणाऱ्यांना याचा चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. याचा सेकंडरी कॅमेरा २ मेगा पिक्सेलचा आहे. यामध्ये विशेष बोकेह इफेक्ट आहे .

Trending Now