​VIVOचा बहुप्रतिक्षित 'V 7+सेल्फी' स्मार्टफोन भारतात लॉन्च

मुंबईत मेहबुब स्टुडिओमध्ये शानदार लॉन्चिंग सोहळा पार पडला. रणवीर सिंग या विवोच्या भारतातल्या ब्रॅडअॅबेसेडरनं या स्मार्टफोनचं लॉन्च केलं.

Sonali Deshpande
स्नेहल पाटकर, 08 सप्टेंबर : चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोनं विवो व्ही 7 प्लस भारतात लॉन्च केलाय.मुंबईत मेहबुब स्टुडिओमध्ये शानदार लॉन्चिंग सोहळा पार पडला. रणवीर सिंग या विवोच्या भारतातल्या ब्रॅडअॅबेसेडरनं या स्मार्टफोनचं लॉन्च केलं. व्हिवोनं या आधी व्हिवो व्ही 5 आणि व्हिवो व्ही 5 एस प्लस बाजारात आणले होतो. त्याचंच व्हिवो व्ही 7 प्लस हे अपग्रेडेड व्हर्जन आपल्याला म्हणता येईल. कारण व्हिवो व्ही 5 एस प्लसमध्ये 20 मेगापिक्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता. आता व्हिवो V 7 प्लसमध्ये 24 मेगापिक्सचा कॅमेरा देण्यात आलाय.

तर 15.22 सेंटीमीटर म्हणजेच 5.99 इंचाचा फुल व्ह्यू एचडी आयपीएस डिस्प्ले यात दिला गेलाय. गोल्ड आणि मॅट ब्लॅक या दोन रंगांत हा फोन उपलब्ध आहे. या फोनसाठीच प्री बुकिंग 7 सप्टेंबरपासून सुरु झालंय. तर 15 सप्टेंबरला या स्मार्टफोनचा फर्स्टसेल असणारेय.क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 ऑक्टाकोअर 64 बीट प्रोसेसर यात देण्यात आलाय. कंपनींन असा दावा केलाय, या प्रोसेसरमुळे 25 टक्क्यांनी फोनचा स्पीड वाढेल आणि गेमिंगला देखील सपोर्ट करेल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेटमुळे तुम्ही गेमिंगचा मनमुराद आनंद घेऊ शकता असा दावा कंपनीनं केलाय.f2.0 अपार्चर आणि फ्लॅशच्या सोबत 24 मेगापिक्सलचा मुनलाईट ग्लो फ्रंटकॅमेरा देण्यात आलाय. फेस ब्युटीमो़ड,फेसब्युटी फॉर व्हि़डीओ कॉल आणि पोर्ट्रेट मोड यात आहेत.तर F2.0 अपार्चर आणि फ्लॅशच्या सोबत 16 मेगापिक्सचा मुनलाईट ग्लो रिअर कॅमेरा देण्यात आलाय. दोन सीम आणि एक एसडीकार्ड असा ट्रिपल स्लॉट या स्मार्टफोन मध्ये आहे. 160 ग्रॅम वजनाच्या या स्मार्टफोनची प्लास्टिक बॉडी आहे. 4 जीबी रॅम, 64 जीबी इंटर्नल स्टोरेज यात आहे जे तुम्ही 256 जीबीपर्यंत एक्सपांड करु शकता. पॉवरसाठी 3225 mAh ची नॉनरिमुवेबल बॅटरी यात देण्यात आलीय.ऑपरेटिंग सिस्टिम अॅड्रॉईड 7.1 नोगटवर हा फोन चालतो. जे फनटच ओएस बेस्ड आहे.कनेक्टिव्हिटीसाठी ब्लुटुथ 4.2, वायफाय, युएसबी, ओटीजी, एफएम यात देण्यात आलय. अॅक्सलेरेमीटर,अॅबियंट लाईट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर ,ई कंपास, जायरोस्कोप याचा एक भाग आहे.एकूणच काय सेल्फी लव्हर्सना डोळ्यासमोर ठेवून व्हिवो व्ही 7 प्लस हा स्मार्टफोन बाजारात आलाय आणि 21,990 रुपयांत ई-काॅमर्ससाईट फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर उपलब्ध आहे.

Trending Now