ही आहे जगातली सगळ्यात लांब बाईक, वजन आहे 450 किलो

14 जुलै : आजकालच्या तरुणाईला बाईकचं मोठं वेड आहे. त्यात त्या तुफान बाईकचा स्पीड आणि लोकांचं लक्ष्य वेधण्यासाठी तिची डिजाईन याचा क्रेझ काही वेगळाच आहे. अशीच तुमचं लक्ष वेधनारी बाईक जाकिर खानने बनवली आहे. तुम्ही थक्क व्हाल पण ही बाईक १३ फूट लांब आहे. ही जगातली सगळ्यात लांब बाईक आहे. बंगळुरूच्या इन्टेरियर डिझायनर जाकिर खान यांने 13 फूट लांबीची बाईक तयार केली आहे. त्याने त्याच्या या बाईकला 'चॉपर बाईक' असं नाव दिलं आहे. या विशाल बाईक 450 वजनाची आहे.

जाकिरने त्याचं जुनं विंटेज कलेक्शन विकून ही जगातील सर्वात लांब बाईक बनवली आहे.

Trending Now