गरीब भारतीयांकडून 'स्नॅपचॅट'च्या सीईओला जशाच तसं उत्तर!

Samruddha Bhambure
16 एप्रिल :  भारतात सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत भारत इतर देशांना कडवी टक्कर देत असताना स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगलनं भारत खूप गरीब देश आहे आणि आमचं अॅप केवळ श्रीमंत देशांसाठी बनवण्यात आलं आहे, असं वादग्रस्त विधान केलं होतं. पण त्याचे परिणाम स्नॅपचॅटला आज भोगावे लागत आहेत.कारण स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पिगेल यांच्या या वक्तव्यानंतर स्नॅपचॅटच्या रेटिंगमध्ये घट होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीयांनी सोशल मीडियावरुन स्नॅपचॅटच्या सीईओंच्या वक्तव्याचा निषेध करुन, आपल्या मोबाईलवरुन हे अॅप अनइन्स्टॉल करत असल्याचं म्हणलं आहे.स्नॅपचॅट सीईओंच्या वक्तव्यानंतर, गुगल प्ले स्टोअरवरील रेटिंग घसरलं आहे. अॅप स्टोअरवर पूर्वी स्नॅपचॅटला पाच स्टारचं रेटिंग मिळत होतं. पण आता त्यात घसरण होऊन एकवर पोहोचलं आहे. तर अॅन्ड्रॉईड प्ले स्टोअरसवरही स्नॅपचॅटच्या रेटिंगमध्ये घसरण झाल्याचं चित्र आहे.

दरम्यान, ट्विटरवरुनही स्नॅपचॅटविरोधात भारतीय नेटिझननी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर स्नॅपचॅटला नेटिझननी ट्रोल करुन चांगलाच फटका दिला आहे. भारतीयांनी ट्विटरवर #boycottsnapchat ही मोहिम सुरु केली आहे. स्नॅपचॅटविरोधातील भारतीयांची ही मोहिम ट्विटरवर सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Trending Now