Youtubeचे व्हिडिओ पाहताना वापरा हे की-बोर्डचे शाॅर्टकट

युट्युब व्हिडिओच्या वेगवेगळ्या फीचर्ससाठी की-बोर्डवर विविध शॅार्टकटस् बनवले आहेत. ज्यात 'अल्फाबेट की'पासून 'न्यूमेरिक की' समाविष्ट केल्या गेल्यात.

Sonali Deshpande
21 आॅगस्ट : इंटरनेटवर युट्युबची क्रेज वाढतीये. आकडेवारीनुसार दर महिन्याला एका बिलियनहून जास्त लोक हे युट्युबवर व्हिडिओ पहातात. पण आपल्यापैकी कमी लोकांना माहीत असेल की की-बोर्ड शॅार्टकटच्या सहाय्यानं आपण युट्युबवर व्हिडिओ सोप्या पद्धतीनं पाहता येतील.युट्युब व्हिडिओच्या वेगवेगळ्या फीचर्ससाठी की-बोर्डवर विविध शॅार्टकटस् बनवले आहेत. ज्यात 'अल्फाबेट की'पासून 'न्यूमेरिक की' समाविष्ट केल्या गेल्यात.अल्फाबेट की (A-Z)

' J ' चा वापर करून चालू असलेल्या व्हिडिओला आपण दहा सेकंद मागे घेऊ  शकतो.' L ' चा वापर करून व्हिडिओ दहा सेकंद पुढे करू शकतो.'Left Arrow' आणि ' Right Arrow' च्या सहाय्याने  व्हिडिओ पाच सेकंद पुढे किंवा मागे घेऊ  शकतो.'Up Arrow' आणि  'Down  Arrow' च्या साह्याने  आवाज कमी-जास्त करु शकतो.'M' चा वापर करून व्हिडिओ म्युट, चालू, बंद करता येऊ शकतो.'F'चा वापर करून व्हिडिओ फुलस्क्रीन मोडवर पाहू शकतो.'Shift + >' चा वापर करून व्हिडिओचा स्पीड वाढवू शकतो.'Shift + <' चा वापर करून व्हिडिओचा स्पीड कमी करता येऊ शकतो.न्यूमेरिक की (01 - 09)1 दाबल्यानंतर व्हिडिओ 10% पुढे घेऊ शकतो,  या प्रमाणे 2 दाबल्यानंतर 20%  पुढे घेऊ शकतो. याप्रमाणे  1 ते 9 'न्यूमेरिक की'चा वापर करून व्हिडिओ फाॅरवर्ड करत पाहू शकतो.

Trending Now