शाओमीचं भारतात 3वर्षांचे सेलिब्रेशन, उद्यापासून बंपर सेल

शाओमी मॅक्स2ची सेल 20 जुलैला दुपारी 12 वाजता सुरू होईल. रेडमी 4ए, वायफाय रिपिटर2, आणि 10000एम ए एच पॉवर बँक सेलमध्ये विकले जातील.

Sonali Deshpande
19जुलै: शाओमीला भारतात तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाओमी कंपनीने 20 आणि 21 जुलैला धमाकेदार सेलची घोषणा केली आहे. या दोन दिवसात आपल्या ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर शाओमी कंपनीने ठेवल्या आहेत.शाओमी मॅक्स2ची सेल 20 जुलैला दुपारी 12 वाजता सुरू होईल. रेडमी 4ए, वायफाय रिपिटर2, आणि 10000एम ए एच पॉवर बँक सेलमध्ये विकले जातील. या सेलमध्ये प्रत्येक खरेदीवर गो आयबीबोकडून 2000 रूपयांचा डोमॅस्टिक हॉटेल बुकिंग व्हाउचर दिलं जाईल. 8000 रूपयांहून जास्त खरेदीवर एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांना पाच टक्के आणि डेबिट कार्ड धारकांना 500 रूपये कॅश बॅक दिला जाईल. एम आय कॅप्स्युल इयरफोन, एम आय हेडफोन्स , एम आय इन-ईयर हेडफोन्स प्रो एचडी, एम आय इन-ईयर हेडफोन्स बेसिक, एम आय सेल्फी स्टिक आणि एम आय व्हिआर प्लेवर 300 रूपयांपर्यंत सूटही दिली जाणार आहे. तसंच 10000एम ए.एच आणि 20000एम.ए.एच एम आय पॉवर बॅँक 2 फक्त 1,199 आणि 2,199 रुपयातच विकले जातील.तसंच बाकीही प्रॉडक्टसवर आकर्षक सूट असेल.

Trending Now