Samsung SM-G9298 स्मार्टफोन लॉन्च

सॅमसंगनं या फोनची किंमत किती असेल याबद्दल अजून माहिती दिलेली नाहीय, मात्र लवकरच भारतात हा फोन उपलब्ध होईल.

Sonali Deshpande
स्नेहल पाटकर, 20 आॅगस्ट : सॅमसंगने गेल्या वर्षी चीनमध्ये  डब्ल्यू2017 फ्लिप फोन लॉन्च केला होता. आता दक्षिण कोरियाई कंपनीनं याचं  अपग्रेडेड वेरिएंट Samsung SM-G9298 बाजारात आणलाय.फोन ब्लॅक कलर वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.काय आहेत सॅमसंग एसएम-जी 9298चे फीचर्स?

1.  4.2 इंचाचा फुल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले2. क्वाड कोर स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर3. 4 जीबी रॅम, 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज यात आहे ज्याला तुम्ही माइक्रोएसडी कार्ड द्वारा 256 जीबी पर्यंत वाढवू शकता.4.  12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे5. 4जी कनेक्टिविटीशिवाय माइक्रो यूएसबी, ब्लूटूथ 4.1, एनएफसी, वाय-फाय , जीपीएस सारखे फीचर्स यात आहेत.6. 2300 एमएएच बॅटरी असणाऱ्या या फोनच वजन 235 ग्रॅम आहे.7. फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, बॅरोमीटर, एक फिंगरप्रिंट सेंसर आणि जायरोस्कोप दिला गेलाय.सॅमसंगनं या फोनची किंमत किती असेल याबद्दल अजून माहिती दिलेली नाहीय,  मात्र लवकरच भारतात हा फोन उपलब्ध होईल.

Trending Now