जिओची समर सरप्राईज आॅफर मागे

ट्रायनं जिओला या ऑफरमध्ये बदल करण्याची सूचना केल्यानंतर जिओनं ऑफरमध्ये बदलं केलाय

Sachin Salve
06 एप्रिल : : रिलायन्स जिओनं आपली समर सरप्राईज ऑफरमध्ये बदल केलाय. ट्रायने केलेल्या सुचनेनंतर रिलायन्स जिओने आपली ही आॅफर मागे घेतली आहे.रिलायन्सने डेटागिरीचा नारा देत फोर जी सेवात जिओ लाँच केली. वेलकम आॅफरच्या अंतर्गत रिलायन्सने तब्बल वर्षभर मोफत सेवा पुरवली. 31 मार्च 2017 रोजी रिलायन्सची वेलकम आॅफर संपली. पण ही सेवा संपण्याआधी रिलायन्स प्राईम मेंबरशिप आॅफर लाँच केली. तसंच 31 तारखेच्या शेवटच्या दिवशीही रिलायन्सने ग्राहकांना मोठा दिलासा दिला.  आपल्या प्राईम मेंबरसाठी 'जिओ समर सरप्राईज' प्लॅन लाँच केला. या प्लॅनमध्ये 15 एप्रिलपर्यंत 303 किंवा त्यापेक्षा जास्तचा प्लॅन रिचार्ज केला तर त्यांना पुढील 3 महिने मोफत डेटा मिळणार होता. पण त्यासाठी 99  99 रुपये देऊन प्राईम मेंबरशिप घेणं बंधनकारक होतं.मात्र आज ट्रायने रिलायन्सला याबद्दल विचारणा केली आणि आॅफरमध्ये बदल करण्याची सूचना केली. त्यामुळे रिलायन्सला जाहीर केलेली समर सरप्राईज आॅफर मागे घ्यावी लागली. आजपासून ही सेवा बंद झाली आहे.

परंतु, आतापर्यंत ज्या ग्राहकांनी हा प्लॅन घेतला असेल त्यांना या प्लॅननुसार पुढील 3 महिने मोफत डेटा मिळणार असल्याचं रिलायन्सने स्पष्ट केलंय. पण नवी ग्राहकांना समर सरप्राईज आॅफरचा लाभ घेता येणार नाही.

Trending Now