रिलायन्स जिओच्या ग्राहकांना खूशखबर, वर्षभर मिळणार मोफत 'प्राईम' मेंबरशिप !

प्राईम मेंबरशिप वाढवायची असेल तर तुमच्या मोबाईलमधील 'मायजिओ' अॅपमध्ये जाऊन....

Sachin Salve
नवी दिल्ली, 30 मार्च : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना खूशखबर दिलीये. प्राईम मेंबरशिपची मुदत एका वर्षाने वाढवण्याची घोषणा रिलायन्स जिओनं केली आहे. तसंच नव्या ग्राहकांना प्राईम मेंबर होण्यासाठी संधी देणार आहे.ज्या ग्राहकांनी रिलायन्स जिओची 99 रुपयांमध्ये प्राईम मेंबरशिप घेतली होती. त्या ग्राहकांची मेंबरशिप ही 31 मार्च 2018 रोजी संपणार होती. पण एका दिवसाआधी रिलायन्स जिओने प्राईम मेंबरशिप एक वर्षाने वाढवून ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. एक वर्ष मुदतवाढ करण्यात आली असून यासाठी प्राईम ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.  तसंच जिओने नव्या ग्राहकांसाठी प्राईम मेंबरशिपसाठी मार्ग मोकळा करून दिला आहे.रिलायन्स जिओने स्पष्ट केलंय की, नव्या ग्राहकांना 99 रुपये देऊन वर्षभरासाठी प्राईम मेंबरशिप घेता येईल. यासाठी मर्यादित कालावधी असणार आहे.

Trending Now