व्हॉट्सअॅपवर 'व्हिडिओ कॉलिंग' दरम्यान अॅप्स हाताळणं झालं सोपं

व्हाट्सअॅपने 'पिक्चर इन पिक्चर' हे नवीन फिचर आणलंय

Sonali Deshpande
24 जुलै:व्हिडिओ कॉलिंगसाठी व्हाट्सअॅपने 'पिक्चर इन पिक्चर' हे नवीन फिचर आणलंय. या सुविधेमुळे युजर्सना आता व्हिडिओ कॉलिंग सुरू असतानाच मोबाईलमधील इतर अॅप्सवरही काम करता येणार आहे.या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करणारे युजर्स आता छोट्या विंडोवरसुद्धा बोलू शकतात, म्हणजेच कॉलवर बोलता बोलता इतर अॅपवरही काम करु शकतात. सध्या हे नवं फिचर फक्त अॅँड्रॉइडसाठीच उपलब्ध असून लवकरच आय.ओ.एस.वर येण्याची शक्यता आहे.यापूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये ही सुविधा नव्हती त्यामुळे मोबाईल धारकांना व्हिडिओ कॉलिंग सुरू असताना दुसरं काहीच करता येत नव्हतं.

Trending Now