असा असेल आयफोन 8, थक्क करणारे आहे फिचर !

अॅपलचा हा नवा आयफोन 8 सॅमसंग गॅलेक्सी एस8 आणि एस8+ प्रमाणेच 'बेझल'लेस असेल.

Sonali Deshpande
18 जुलै: बहुप्रतिक्षित अॅपल आयफोन 8 चा फायनल लूक निश्चित झालंय. फोर्ब्सने काही फोटोंमधून आयफोनचा फायनल लूक जाहीरही केलायअॅपलचा हा नवा आयफोन 8 सॅमसंग गॅलेक्सी एस8 आणि एस8+ प्रमाणेच 'बेझल'लेस असेल. या मोबाईलमध्ये 5.8 इंचांची डिस्पले स्क्रिन असेल. या मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याच्या टॉपवर सेंसर लावला असेल. या मोबाईलमध्ये उभा ड्युअल लेंस रियर कॅमेरा असेल. या मोबाईलचं चार्जर वायरलेस असेल. या मोबाईलच्या फ्रंट ग्लासमध्ये टच आयडी टेक्नॉलॉजी लागली असेल. रिलीज होण्याआधी लिक झालेले याचे काही स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ या.

 आयफोन 8 चे फिचर्स ?  1.होम बटन - हे बटन डिस्प्ले स्क्रिनच्यामागे किंवा खाली दिलं असेल2.टच आयडीमध्ये आयरिश स्कॅनिंग3.थ्री डी सेंसर टेक्नॉलोजी ज्याने फेशियल रेक्गनिशन करता येईल.4.ड्युअल लेंस कॅमेरा5.वायरलेस चार्जिंग6.अॅपल पेन्सिल सपोर्ट7.युएसबी-सी चार्जिंग8.वॉटर रेझिसटेंस9.हाय क्वालिटी इयरपीस10.अॅपल नेक्स्ट जनरेशन प्रोसेसर11.स्टेन्लेस स्टील आणि ग्लास बॉडी12. 3 जीबी रॅम आणि 64 जीबा व्हेरिएंट असेल13.इंटेलचा क्वॅलकॉम मॉडेलया मोबाईलची किंमत अंदाजे 55000 ते 71000 पर्यंत असणार आहे.  

Trending Now