व्हाॅटसअॅपवर तासाभरानंतरही डिलिट करता येणार मेसेज

आता व्हॉट्सअॅपवर केलेला एखादा मेसेज आता एक तासानंतरही डिलीट करता येणार आहे. सध्या याचं बिटा टेस्टिंग सुरू आहे.

Sonali Deshpande
05 मार्च : व्हाॅटसअॅपवर आलेले मेसेज बऱ्याचदा नुसते फाॅर्वड केले जातात. मग कधी कधी एखादा मेसेज चुकून नको त्या ग्रुपवर पाठवला जातो. आता मान्य की पहिल्या सात मिनिटांत तो परत घेतला जातो. पण सात मिनिटांनंतर लक्षात आलं तर? आता व्हॉट्सअॅपवर केलेला एखादा मेसेज आता एक तासानंतरही डिलीट करता येणार आहे. सध्या याचं बिटा टेस्टिंग सुरू आहे.सध्या फक्त 7 मिनिटांपर्यंतच मेसेज डिलिट करता येतो. पण यावर लोकांची तक्रार होती. मेसेज डिलिट केला तरी तो ज्याला पाठवला होता, त्याला नोटिफिकेशनमध्ये दिसतो, अशी तक्रार होती. ही त्रुटीही आता दूर करण्यात येणार आहे.

Trending Now