स्वस्त आणि मस्त :नोकिया 105 आणि नोकिया 130 झाले लाँच

सिंगल सिम व्हेरिएंटची किंमत 999 रुपये आहे तर ड्युअल सिमची व्हेरिएंटची किंमत 1,149 रुपये आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat
18 जुलै : सोमवारी नोकिया 105 आणि नोकिया 130 फिचर फोन लॉन्च  झाले आहेत. नोकिया 105 ला सिंगल आणि डबल सिम या दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात नोकियाने उतरवलंय. सिंगल सिम व्हेरिएंटची किंमत 999 रुपये आहे तर  ड्युअल सिमची व्हेरिएंटची किंमत 1,149 रुपये आहे.19 जुलैपासून विक्री सुरू होईलनोकिया 105 मध्ये ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक कलर व्हेरिएंटही बाजारात आले आहेत. 19 जुलैपासून  या फिचर फोन्सची विक्री सुरू होणार आहे.  नोकिया 130 रेड, ग्रे आणि ब्लॅक कलर व्हेरिएंटमध्ये लवकरच बाजारात येईल. नोकिया 130 फिचर फोनसुद्धा सिंगल आणि ड्युअल सिम व्हेरिएंटमध्ये बाजारात लवकरच येणार आहे.

नोकिया 105चे  फिचर- नोकिया 105 मध्ये  1.8 इंच QVGA स्क्रिन  आहे.- या फिचर फोनची बॅटरी क्षमता 800mAh आहे.- नोकिया 105 मध्ये 15 तासांचा  टॉक टाइम  आणि एका महिन्याचा  स्टॅँडबाय टाइम दिला गेला आहे.-नोकिया 105 नोकिया 30+ सॉफ्टवेअरवर रन होईल.- यामध्ये 4 एमबी रॅम आणि 4 एमबी स्टोरेज दिलंय.- नोकिया 105मध्ये इनबिल्ट एफ.एम. रेडिओ आहे.- या फिचर फोनचे वजन 73 ग्राम आहे.- नोकिया 105मध्ये 500 टेक्स्ट मॅसेज आणि 2 हजार कॉन्टॅक्ट सेव्ह होऊ शकतात.नोकिया 130 फीचर-नोकिया 130 मध्ये VGA कॅमरा इनबिल्ट आहे.- हा मोबाईल MP3 प्लेअरला सपोर्ट करतो.- नोकिया 130 मध्ये 3.5एम.एमचा  ऑडियो जॅक आणि मायक्रो-यूएसबी पोर्ट दिला आहे.- नोकिया 130 मध्ये 1.8 इंचाचा QVGA रंगीत डिस्प्ले  आहे.- नोकिया 130 मध्ये 4एमबी रॅम आणि 8एमबी स्टोरेज आहे.- मायक्रो एसडी कार्डने स्टोरेज 32 जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.- नोकिया 130 मध्ये 1020mAH बॅटरी दिली आहे.-या मोबाईलमध्ये 44 तास एफ.एम. रेडिओ चालवला  जाऊ शकतो.

Trending Now