आता फेसबुकसाठीही लागणार 'आधार' ?

फेसबुक अकाऊंट उघडताना आधार कार्डवरील क्रमांकाची मागणी करत नाहीये.

Sachin Salve
27 डिसेंबर :  तुमचं फेसबुकवर अकाऊंट आहे का?, जर नसेल तर तुम्हाला नवी अकाऊंट उघडण्यासाठी आधार कार्डचा 'आधार' घ्यावा लागणार आहे.आता यापुढे फेसबुक अकाऊंट उघडण्यासाठी आधार कार्डचा वापर होणार आहे. फेसबुक भारतात एक नवी फिचर्स लाँच करत आहे. ज्यामध्ये फेसबुकवर अकाऊंट तयार करत असताना आधार कार्डवर असलेलं नाव रजिस्टर करावे लागणार आहे.फेसबुक सध्या या नव्या फिचरची चाचणी करत आहे. जेणे करून  सोशल मीडियावर वापरकर्त्याला आपलं खरं नाव वापरता येईल हा त्याचा मुख्य हेतू आहे.

फेसबुकने स्पष्ट केलंय की, आम्ही हे यासाठी करतोय की वापरकर्त्याने त्याचं खरं नाव वापरावं, त्यामुळे त्याची ओळख पटवण्यास सोप होईल. सोशल मीडियावर मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत कनेक्ट होण्यासाठीही अधिक सोईस्कर राहिल.आधार कार्ड कनेक्ट करण्याची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे. आम्ही वापरकर्त्यांना आवाहन करतो की त्यांनी आपलं आधार कार्ड वापरावं, तुर्तास हा फक्त पर्याय असून कोणतीही सक्ती नाही असंही फेसबुकने स्पष्ट केलं.फेसबुक अकाऊंट उघडताना आधार कार्डवरील क्रमांकाची मागणी करत नाहीये. फक्त आधार कार्डवरील तुमचे नाव वापरावे असंही फेसबुकने स्पष्ट केलंय.विशेष म्हणजे, वापरकर्त्यांना आधारच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याआधीही शासकीय वेबसाईट, बँका, टेलिकाॅम आॅपरेटर्स आणि विमा कंपन्यांकडून आधाराचा डेटा लिक झाल्याचं समोर आलंय.परंतु, फेसबुक आधार कार्डची मागणी करणारी पहिली कंपनी नाही. याआधीही अॅमेझानने हरवलेले पार्सल शोधण्यासाठी ग्राहकांना आधार कार्डवरील क्रमांक अपलोड करण्यासाठी सांगितलं होतं.

Trending Now