तरुणांसाठी गुगलची खास सेवा 'गुगल फॉर जॉब्स'

बेरोजगार तरुणांसाठी आता गुगलने खास सेवा सुरू केली आहे. 'गुगल फॉर जॉब्स' असं या फीचरचं नाव आहे.

Renuka Dhaybar
25 एप्रिल : बेरोजगार तरुणांसाठी आता गुगलने खास सेवा सुरू केली आहे. 'गुगल फॉर जॉब्स' असं या फीचरचं नाव आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्याचं काम सोपं व्हावं यासाठी गुगलकडून हा प्रयत्न करण्यात आला आहे.गुगलने ही सेवा पहिल्यांदा अमेरिकेत सुरू केली होती. सध्या ही सेवा इंग्रजीमध्येचं उपलब्ध होणार आहे. याशिवाय टाईम्स जॉब्स, शाईन जॉब्स आणि लिंकडिन यासारख्या अनेक संकेतस्थळांसोबतही गुगलने भागीदारी केली आहे. या योजनेत राज्य सरकारबरोबरही करार करण्याचा गुगलचा प्रयत्न सुरू आहे.गुगलच्या या नव्या सेवेमुळे अनेक तरूणांना नोकरी मिळवणं सोपं जाणार आहे. याची योग्य प्रकारे अमंलबजावणी केली गेल्यास या बेरोजगारी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

Trending Now