आता घरी मोबाईलवरही बनवू शकता पासपोर्ट !

पासपोर्टसाठी अर्ज आता तुम्ही कुठूनही करू शकता. कारण त्यासाठी एक नवं अॅप तयार करण्यात आलं आहे.

Renuka Dhaybar
नवी दिल्ली, 27 जून : पासपोर्टसाठी अर्ज आता तुम्ही कुठूनही करू शकता. कारण त्यासाठी एक नवं अॅप तयार करण्यात आलं आहे. तुम्ही जर जळगावात रहात असाल, आणि कामानिमितित दिल्लीत असाल, तर दिल्लीतून तुम्ही अर्ज करू शकाल.सहाव्या पासपोर्ट सेवा दिवशी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही योजना लाँच केली आहे. दुसरं म्हणजे आता पासपोर्टसाठी मॅरेज सर्टिफिकीट आणि जन्मदाखला द्यायची गरज नाही आहे. तसंच, घटस्फोटित महिलांना आधीच्या पतीचं नाव देणंही गरजेचं नाही आहे.

हेही वाचा...

मावसभावाकडूनच भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या

ऑनलाइन नोंदणीमुळे आपलं काम खूपच सोपं झालंय. त्यातच आता ही प्रक्रिया परराष्ट्र खात्यानं आणखी 'अॅपडेट' केली आहे. स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे आपण कुठूनही पासपोर्टसाठी अर्ज करू शकतो. मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत आजच्या पासपोर्ट सेवा दिनाच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी 'पासपोर्ट सेवा अॅप' लॉन्च केलं.लग्नाच्या दाखल्याची गरज नाही!पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आत्तापर्यंत लग्नाच्या दाखल्याचा समावेश होता. परंतु, यापुढे पासपोर्टसाठी 'मॅरेज सर्टिफिकेट'ची गरज लागणार नाही.जन्मतारखेचा पुरावाजन्मतारखेचा पुरावा म्हणून बरीच वर्षं अर्जदाराला जन्माचा दाखला द्यावा लागत होता. अनाथाश्रमातील मुलांसाठी, तिथल्या प्रमुख जी जन्मतारीख सांगेल, ती ग्राह्य धरली जाते. त्यामुळे जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागणार नाही.साधू-संन्यासी, घटस्फोटितांना दिलासासाधू, संन्यासी आपल्या पासपोर्टवर आई-वडिलांऐवजी गुरूचं नावही देऊ शकणार आहेत. तसंच, घटस्फोटित महिलांना आपल्या आधीच्या पतीचं नाव अर्जात भरावं लागणार नाही.तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण 'पासपोर्ट सेवा अॅप' डाउनलोड करू शकतो. त्या आधारे पासपोर्टची पूर्ण प्रक्रिया सोपी होईल, असा विश्वास परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला.

हेही वाचा...

आदेशाच पालन करा, नाहीतर...! 'या' मुद्द्यावर हायकोर्टाने राज्यभरातील महापालिकांना ठणकावलं

उदयनराजे आणि रामराजे यांच्यात पुन्हा वाकयुद्ध, विश्रामगृहात आमने-सामने

झारखंडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 6 जवान शहीद

 

Trending Now