आला मोटोचा ई 4 प्लस, बॅटरी टिकेल 2 दिवस !

मोटो ई4 प्लस फक्त रू 9,999 इतक्या कमी किमतीत आज भारतात लॉंच झालाय.

Sonali Deshpande
12जुलै :तब्बल दोन दिवस डिस्चार्ज होणार नाही इतकी बॅटरी असलेला मोटो ई4 प्लस फक्त रू 9,999 इतक्या कमी किमतीत आज भारतात लॉंच झालाय. जूनमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लॉंच झालेल्या या मोबाईलसोबत अजूनही अनेक सवलती मिळणार आहेत. स्वस्त आणि मस्त मोबाईल शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.आज रात्री 11.59 वाजता या मोबाईलची सेल फ्ल्पिकार्टवर चालू होणार आहे. या मोबाईल फोनसोबत मोटो प्लस 2 इयरफोन्स 649 रूपयात मिळणार आहेत तर यासोबतच हॉटस्टारचं प्रिमियम सबस्क्रिपशनही फ्री दिलं जाईल. जर तुम्ही व्होडाफोनचे ग्राहक असाल तर या मोबाईलसोबत तीन महिन्यांचा 84 जीबीचा डेटा फक्त 443 रूपयात मिळेल. जिओच्या युजर्सला 30जीबी अधिक डेटा दिला जाईल. तसंच या मोबाईलवर 9000 रुपयांची एक्सेंज ऑफर आणि 4000 रुपयांची बायबॅक गॅरंटीही दिली जातेय.कसा आहे मोटो ई 4 प्लस?

- मोबाईलला 5.5 इंचांची डिस्प्ले स्क्रीन आहे.- quad-core Qualcomm Snapdragon 427 प्रोसेसर या मोबाईलमध्ये आहे.- 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजही या मोबाईलमध्ये आहे.-या मोबाईलला 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा.-या मोबाईलमध्ये वॉटर रिपेलंट कोटिंग आहे. ज्यामुळे पाणी गेलं तरी हा मोबाईल खराब होणार नाही.-5000एमएएचची बॅटरी

Trending Now