एअरटेल-टाटाची 'युती', लवकरच होणार मोठे बदल

टाटा टेली-सर्व्हिसेस लिमिटेड (टीटीएसएल) आणि टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड (टीटीएमएस) व्यवसाय आता भारती एअरटेलमध्ये समाविष्ट होणार आहे.

Sachin Salve
14 आॅक्टोबर : आता टाटा टेली-सर्व्हिसेस लिमिटेड (टीटीएसएल) आणि टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड (टीटीएमएस) व्यवसाय आता भारती एअरटेलमध्ये समाविष्ट होणार आहे. भारती एयरटेल आणि टाटाने गुरुवारी याची घोषणा केली. आता हा व्यवहार किती पैशाला झाला याबद्दल अद्यापही कोणतीही माहिती मिळालेली नाही.डेटा-फ्री आणि कॅश-फ्री या करारावर या दोन्ही कंपन्या एकत्र आल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.  टाटाद्वारे टेलीकॉम डिपार्टमेंटला स्पेक्ट्रमसाठीची रक्कम देण्याची जबाबदारी आता भारती एअरटेलची आहे. या करारानुसार भारती एअरटेल आता टाटाच्या टीटीएसएल आणि टीटीएमएसच्या देशातील 19 सर्कल्समधील ग्राहकांना सेवा पुरवणार आहे.भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी म्हटलंय की,"भारतीय मोबाईलच्या इंडस्ट्रीमध्ये एकीकरणासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. मजबूत तांत्रिक आणि ठोस स्पेक्ट्रम पोर्टफोलिओद्वारे जागतिक दर्जाच्या स्वस्त टेलिकम्युनिकेशन सेवा पुरवून भारताची डिजीटल क्रांती व्हावी यासाठी आम्ही आमची बांधिलकी मजबूत करतो. "

टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखर यांनी म्हटलंय की, "आमच्यानुसार हा करार टाटा समुहासाठी आणि त्यांच्या हितधारकांसाठी सगळ्यात अनुकुल असं पाऊल आहे. आमच्यासोबत जोडलेल्या ग्राहकांसाठी आणि आमच्या कर्मचाऱ्यांसाठी योग्य ती सेवा आमची प्राथमिकता आहे. आम्ही भारती एअरटेल सोबत करार करुन खूप खुश आहोत. या करारासाठी गोल्डमन सैकस (इंडिया) सिक्युरिटीज प्रा. लिमिटेड हे टाटाचे आर्थिक सल्लागार आहेत."

Trending Now