एलजीचा नवीन फोन 'व्ही 30 प्लस' बाजारात लॉन्च; 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यामध्ये दिला गेलेला फुलव्हिजन डिस्प्ले आणि ड्युअल रिअर कॅमेरा.

Sachin Salve
17 डिसेंबर : एलजीनं भारतात आपला नवीन स्मार्टफोन व्ही 30 प्लस लॉन्च केलाय. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यामध्ये दिला गेलेला फुलव्हिजन डिस्प्ले आणि ड्युअल रिअर कॅमेरा.या शिवाय या फोनमध्ये बँग अँड ऑल्युफ्सन चे 32-बिट हाय-फाय क्वाड डॅकच्या सोबत बीअॅन्डओ प्ले ईयरफोन सुध्दा दिले गेलेत. व्ही 30+ डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट आहे तेही आयपी68 सर्टिफिकेशनच्या सोबत आहे. या फोनमध्ये फेस अनलॉक फिचर दिलं गेलय.या डिवाइसमध्ये एक फ्लोटिंग बार इंटरफेस आहे जो या आधीच्या व्ही सीरीज व्हेरिएंट मधल्या सेकंडरी टिकर डिस्प्ले च्या जागी दिला गेलाय. या शिवाय एक ऑलवेज़-ऑन डिस्प्ले सुध्दा यात आहे. एलजी व्ही 30+ च्या डिस्प्ले मध्ये एचडीआर10 सपोर्ट आहे. हे फिचर सध्याच्या खुप कमी स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहे.

एलजी व्ही30+ ला भारतात 44,990 किमतीत लॉन्च केले गेलय. हा स्मार्टफोन एक्सक्लूझिवली अमेझॉन इंडियावर उपलब्ध आहे. 18 डिसेंबरपासून हा फोन ओपन सेल मध्ये उपलब्ध असणार आहे. त्यासाठीचं प्री बुकिंगही सुरु झालंय. एलजी व्ही 30+ ला भारतात क्लाउड सिल्व्हर आणि ऑरोरा ब्लॅक कलर व्हेरियंट मध्ये उपलब्ध केलं केलय.लॉन्च इव्हेंटमध्ये कंपनीनं माहिती दिलीय की, एलजी व्ही 30+ च्या ग्राहकांना 12 हजार रुपये च्या किंमतीत वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत मिळेल. याशिवाय एलजी, 3 हज़ार रुपयांचा वायरलेस चार्जर सुध्दा ऑफर करतेय. याशिवाय व्ही30+ स्मार्टफोन अॅड्रॉईड 7.1.2 नोगटवर आधारित यूएक्स 6.0 इंटरफेस वर चालतो. या स्मार्टफोन मध्ये 6 इंचाचा क्वाडएचडी+ ओलेड फुलव्हिजन डिस्प्ले दिला गेलाय. या फोन मध्ये क्वालकॉम 835 चा प्रोसेसर आणि 4 जीबी एलपीडीडीआर 4एक्स रॅम आहे. एलजी व्ही30+ चं इंटर्नल स्टोरेज 128 जीबी आहे. ज्याला माइक्रोएसडी कार्ड द्वारा 2 टीबी पर्यंत वाढवलं जाऊ शकतं.एलजी व्ही30+ च्या ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मध्ये अपार्चर एफ/1.6, 71 डिग्री वाइड-अॅंगल लेंन्स एक 16 मेगापिक्सल सेंसर आणि अपार्चर एफ/1.9 च्या सोबत 120 डिग्री वाईड अॅंगल लेंसच्या सोबत एक 13 मेगापिक्सल चा सेंसर आहे. कॅमेऱ्यामध्ये एक क्रिस्टल क्लियर लेंन्स आहे. ज्यामधून कलर रिप्रोडक्शन आणि स्पष्ट फोटो घेता येतात.एलजी व्ही30+ मध्ये फ्रंटवर एक 5 मेगापिक्सलचा वाईड-अॅगल (90 डिग्री) कॅमेरा आहे जो अपार्चर एफ/2.2 आहे.कनेक्टिव्हिटी साठी ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी, एनएफसी, जीपीएस/ए-जीपीएस, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि वाय-फाय हे फिचर्स दिले गेलेत. तर अॅक्सीलेरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेंसर, डिजिटल कंपास, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिले गेलेत. या हॅन्डसेटचं वजन 158 ग्रॅम आहे. फोनमध्ये पावरसाठी 3300 mAh बॅटरी दिली गेलीय.

Trending Now