आला 'कोडॅक'चा खास फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन, हे आहेत फिचर !

कोडॅक कंपनी 'कोडॅक एक्ट्रा' हा नवीन स्मार्टफोन घेऊन आलीय. हा मोबाईल खास फोटो काढण्यासाठीच डिझाईन केला गेलाय. कोडॅक एक्ट्राची किंमत 19,990 रुपये आहे.

Sonali Deshpande
18जुलै : कोडॅक कंपनी फोटो फिल्म आणि कॅमेऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण आजकालच्या स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये लोकं मोबाईलचाच वापर फोटो काढण्यासाठी करतात. म्हणूनच कोडॅक कंपनी 'कोडॅक एक्ट्रा' हा नवीन स्मार्टफोन घेऊन आलीय. हा मोबाईल खास फोटो काढण्यासाठीच डिझाईन केला गेलाय.कोडॅक एक्ट्राची किंमत 19,990 रुपये आहे. ग्राहकांच्या क्रिएटीव्हीटीला वाव देण्यासाठी RAW ला सपोर्ट दिला गेलाय. या मोबाईलमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा इंटरनल स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवला जाऊ शकतो. या मोबाईलमध्ये 21 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर 13 मेगापिक्सलचा फेज डिटेक्शन ऑफ फोकससोबत फ्रंट कॅमेरै दिला गेलाय.

या फोनमध्ये कमीत कमी लाईट असतानाही फोटो काढण्यासाठी ARCSOFT नाईट शॉट टेक्नॉलोजीही दिली आहे.हा मोबाईल एक्स2 0 प्रोसेसरवर काम करेल. तसंच एडिटिंगसाठी 'स्नॅपसीड' हे एडिटिंग सॉफ्टवेअरही या मोबाईलमध्ये दिलं गेलंय. 

Trending Now