एअरटेलकडून आयपीएलच्या खोट्या जाहिराती, जिओने एअरटेलला खेचलं कोर्टात

आयपीएलच्या सगळ्या सामन्यांचं मोफत आणि थेट प्रक्षेपण मोबाईलवर पाहता येईल अशा आशयाची जाहिरात एअरटेलने दिली होती

Chittatosh Khandekar
14 एप्रिल: आयपीएलच्या प्रक्षेपणाबाबत खोटी जाहिरात दिल्याप्रकरणी रिलायन्स जिओने एअरटेलला कोर्टात खेचलंय. याप्रकरणी जाहिरातीतील खोटी माहिती बदलण्याचे आदेश हायकोर्टाने एअरटेलला दिले आहेत.आयपीएलच्या सगळ्या सामन्यांचं मोफत आणि थेट प्रक्षेपण मोबाईलवर पाहता येईल अशा आशयाची जाहिरात एअरटेलने दिली होती. या जाहिरातीनुसार ग्राहकांना आयपीएलचं थेट आणि मोफत प्रक्षेपण पाहायचं असल्याच त्यांनी एअरटेलचं कार्ड घ्यावं. त्यात एअरटेल टीव्हीचं अॅप डाऊनलोड करावं. त्यावर मग आयपीएलचे सामने मोफत पाहता येतील.पण मुळात आयपीएलचे सामने फक्त हॉटस्टार अॅपवर मोफत पाहता येणार आहेत आणि त्याचा एअरटेल इंटरनेटशी किंवा सिम कार्डशी काहीच संबंध नसल्याचा आरोप जिओने केला होता. तसंच सामने पाहताना इंटरनेटच्या होणाऱ्या वापरानुसार शुल्क आकारले जाईल असंही जिओने कोर्टात म्हटलं आहे. जिओकडून अभिषेक मनु सिंघवी जिओचा खटला लढवत होते.

दरम्यान दिल्ली हायकोर्टाने दोघांचीही बाजू ऐकल्यानंतर एअरटेलची जाहिरातीतील माहिती खोटी असल्याचं मान्य केलं. तसंच जाहिरातीतील मोफत थेट प्रक्षेपणाचा भाग काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान एअरटेलनही याला दुजोरा दिला आहे.(डिस्क्लोजर : news18lokmat.com हा नेटवर्क 18 मीडिया आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा भाग असून या कंपनीची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आहे. रिलायन्स जिओसुद्धा याच कंपनीचा भाग आहे)

Trending Now