जिओची आणखी एक डिजिटल भरारी, 'स्क्रिनज'सोबत भागिदारी

या भागीदारीमुळे जिओ स्क्रिनज भारतात सर्वात मोठं प्लॅटफाॅर्म बनणार आहे. भारतात मनोरंजक गेमिंगचं हे एकमेव साधन असणार आहे.

Sachin Salve
नवी दिल्ली, 17 मे : रिलायन्स जिओ इन्फोकाॅम लिमिडेड (जिओ)ने आज भारतीय बाजारपेठेसाठी स्क्रीनजसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. स्क्रीनज हे मनोरंजनासाठी एक संवाद साधण्यासाठी साधन आहे. ज्याचा जगभरात प्रमुख ब्राडकास्टर्स वापर करतात. या भागीदारीमुळे जिओच्या गेमिंग प्लॅटफाॅर्मला मजबुती मिळणार आहेत.'जिओ क्रिकेट प्ले अलाॅन्ग' हे 6 कोटी 50 लाखांहुन अधिक युझर्स खेळत आहे. याआधीही 'कौन बनेगा करोडपती प्ले अलाॅन्ग' केबीसी गेम हा घरोघरी पोहोचलाय. घरात बसलेले सर्वसामन्य नागरीकही गेम खेळू शकत होते.या भागीदारीमुळे जिओ स्क्रिनज भारतात सर्वात मोठं प्लॅटफाॅर्म बनणार आहे. भारतात मनोरंजक गेमिंगचं हे एकमेव साधन असणार आहे.

यामुळे ब्राॅडकास्टर्स आणि पब्लिशर्स चांगले अंगेजिंग कटेंट तयार करू शकेल. गरज भासल्यास याचा दुसऱ्या भागातही नेण्यात येईल. यामुळे  ब्राॅडकास्टर्स आणि युझर्समध्ये लाईव्ह, रिअल टाईम संवाद साधण्यास सोईस्कर होईल.जिओ स्क्रिनज हे वापरकर्त्यांची वेगळी ओळख आणि प्राफाईल तयार करण्याची क्षमता राखते. ज्यामुळे फक्त विशेष वापरकर्त्यांसाठी चांगले कार्यक्रम तयार करता येतील. सोबतच ब्राॅडकास्टर्सला नवीन जाहिरातीसाठी संधीही मिळेल.उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या ड्यूल स्क्रीनच्या वापरामुळे मोठा बदल पाहण्यास मिळेल. टिव्ही आणि मोबाईलवर जाहिरातीचा नवीन चेहरा पाहण्यास मिळेल.मागील काही दिवसांपासून जिओकडून लाँच केलेला हा दुसरा उपक्रम आहे. मागील आठवड्यातच जिओने  JioInteract नावाने जगात पहिला आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेसड एंगेजमेंट प्लेटफॉर्म लाँच केला होता.जिओही ग्राहकांचं हित राखणारी कंपनी आहे. जिओ आपल्या ग्राहकांसाठी कमी किंमतीत चांगल्या सुविधा आणि नवनविन फिचर्स देत असते.जिओ स्क्रिनजचं वैशिष्ट्य1) जिओ स्क्रिनजमुळे एखादा टीव्ही शो सुरू असेल तर ब्राॅडकास्टर्स आणि दर्शकाला दोन्हीकडून संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे. रिअल टाईममध्ये प्रश्न उत्तर आणि वोटिंगही करता येईल.2) हे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टिम (सीएमएस)चा वापराला अधिक सोपं बनवतो. जे ब्राॅडकास्टर्स आणि संवाद साधणारं कंटेंट तयार करण्यात मदत होईल.3) हे अँड्राईड, आयओएस आणि जिओ-काईओएसवर वापरता येईल.4) जिओ स्क्रिनज वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट जसे गुगल, फेसबुक, टि्वटर सारख्या प्लॅटफाॅर्मला सपोर्ट करणार आहे.5) हे रिच डेटा रिपोर्टिंगला सपोर्ट करतोय. आणि प्रत्येक वापरकर्त्याची विशिष्ट प्राफाईल तयार करतो, यामुळे ठराविक गटासाठी जाहिरात करू शकतो.(डिस्क्लोजर : news18lokmat.com हा नेटवर्क 18 मीडिया आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा भाग असून या कंपनीची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आहे. रिलायन्स जिओसुद्धा याच कंपनीचा भाग आहे)

Trending Now