भारतात लाँच होतेय अॅपल वॉच सीरिज 3!

जीपीएसबरोबरच सेल्युलर सुविधा असलेलं 'अॅपल वॉच सीरिज 3' लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. एअरटेल आणि रिलायन्स जियोने या अॅपल वॉचबरोबर टाय अप केलेलं आहे.

Sonali Deshpande
25 एप्रिल : जीपीएसबरोबरच सेल्युलर सुविधा असलेलं 'अॅपल वॉच सीरिज 3' लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. एअरटेल आणि रिलायन्स जियोने या अॅपल वॉचबरोबर टाय अप केलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच जिओ ग्राहक 'अॅपल वॉच सीरिज 3' वापरणार असून, त्यांना कॉल करण्यासाठी तसेच, इंटरनेट आणि अॅप्स वापरण्यासाठी मोबाईल जवळ ठेवण्याची गरज नाही.या सेवेसाठी जिओ अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. एकाच सबस्क्रिप्शनच्या दरात ही सेवा मिळणार आहे. आधी नोंदणी केलेल्या ग्राहकांना पहिल्याच दिवशी डिलिव्हरी देण्यात येणार आहे. टअॅपल वॉच सीरिज 3' सेल्युलरसाठी  ग्राहकांना 4 मेपासून www.Jio.com, रिलायन्स डिजिटल आणि जिओ स्टोअर इथे आगाऊ नोंदणी करता येईल. हे उत्पादन 11 मेपासून उपलब्ध होईल.

Trending Now