तुमचं आधार कार्ड मोबाईलशी जोडलंय? असं पहा पडताळून

खालील काही पद्धतीने तुमचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आधार कार्डशी लिंक झाला आहे का हे पडताळून पाहू शकता.

Sachin Salve
15 डिसेंबर : 12 अंकी आधार कार्ड सध्या खूपच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आपल्या बँक अकाऊंट, पॅन कार्ड, म्यूचुअल फंड, PPF अकाऊंट आणि इतर सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी आपलं आधार कार्ड लिंक करण खूप महत्त्वाचं आहे. आपले आधार खाते मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीला जोडण्यासाठी सध्या सगळेच गडबडीत होते. खालील काही पद्धतीने तुमचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी आधार कार्डशी लिंक झाला आहे का हे पडताळून पाहू शकता.1) सर्व प्रथम UIDAI वेबसाइट uidai.gov.in उघडा.

2) त्यानंतर आधार सर्विसेस वर जा. ई-मेल / मोबाईल नंबर पडताळून पाहण्यासाठीच्या पर्यायावर क्लिक करा.3) आपण या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्याला आधार नंबर, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर आणि सुरक्षा कोड टाकण्यासाठी सांगितले जाईल.4) ही सगळी माहित भरल्यानंतर 'गेट वन टाइम पासवर्ड' या पर्यायावर क्लिक करा. असं केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ई-मेल आयडीवर एक ओटीपी येईल.5) जर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी लिंक झालं असेल तर तुम्ही अशा वेबसाईटवर पोहचाल त्यावर तुम्हाला समजेल की तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी पडताळून झाला आहे.

Trending Now