मोबाईल फोनच नव्हे तर ही आहे 'मोबाईल गन'

ही गन जेम्स बाँडच्या वस्तू सारखी आहे. जी की स्मार्टफोनपासून एका पिस्तुलीमध्ये बदलते. ही नागरीकांसाठी सुरक्षीत आहे.

Sachin Salve
12 मे : मोबाईल फोनवर प्रेम करणाऱ्यांनो, जर तुमचा फोन हा संकट समयी पिस्तुल झाला तर कसं वाटले...तर दचकू नका असा पिस्तुल फोन तयार करण्यात आलाय. त्याला नाव दिलं 'मोबाईल गन'.ही 'मोबाईल गन' अमेरिकेतील रहिवासी किर्क केजेलबर्ग याने तयार केलीये. केजेलबर्गच्या म्हण्यानुसार "ही गन जेम्स बाँडच्या वस्तू सारखी आहे. जी की स्मार्टफोनपासून एका पिस्तुलीमध्ये बदलते. ही नागरीकांसाठी सुरक्षीत आहे.या 'मोबाईल गन'ला अमेरिकेनं सरकारकडून मंजुरी मिळवण्यासाठी एक वर्ष लागले. एका पोलीस अधिकारी आणि हत्यार निरीक्षक जेफ प्रेडो यांचं म्हणणंय की, "सुरक्षेच्या दृष्टीने हा एक वाईट अविष्कार आहे. संकटाच्या वेळी वेगाने काम करणार नाही आणि भयाकार स्थिती तयार करू शकते. तर दुसरीकडे अमेरिकेच्या पोलीस विभागाला ही 'मोबाईल गन' आवडली नाही त्यांनीही याला नकार दिलाय.

(courtesy by - cleveland19.com

Trending Now