तुम्ही गुगलने मराठीकरण केलेली नावं ऐकली का?

तुम्ही मुंबईकर असाल तर ईचीची बँक, वांद्रे दावा, ही नावे कधी ऐकली आहेत का? ऐकली नसतील तर तुम्ही गुगल मॅपला भेट द्या.

Sonali Deshpande
28 डिसेंबर : तुम्ही मुंबईकर असाल तर ईचीची बँक, वांद्रे दावा, ही नावे कधी ऐकली आहेत का? ऐकली नसतील तर तुम्ही गुगल मॅपला भेट द्या. आबालवृद्धांचा दिशादर्शक असलेल्या गुगल मॅपवर अनेक ठिकाणांचे मराठीकरण करीत असताना मराठीचा नकाशाच बदलला आहे. यामुळे गुगलचे मराठी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.नकाशा प्रादेशिक भाषांमध्ये असावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. यानुसार गुगलने नकाशाचे मराठीकरण करण्यास सुरुवात केली. परंतु गुगल भाषांतर सुविधेतील भाषाअज्ञानाचा फटका नकाशाचे मराठीकरण करताना बसला आहे.गुगलचं मजेशीर मराठीकरण

आयसीआयसीआय बँक -  ईचीची बँकघोडबंदर रोडवरील सिल्‍व्हर पाम लॉन्स - चांदी तळवे लॉनवांद्रे रेक्लमेशन - वांद्रे दावावांद्रे सी व्ह्यूचे - वांद्रे समुद्र पहाअम्बापाडा - अम्बपदाबेंगनवाडी - बैगांवादीमंडाला - मनडाला

Trending Now