नोकरी शोधताय? आता गुगल झालंय मदतीला सज्ज

गुगलवर आपण नोकरीही शोधू शकतो.यामुळे कंपन्यांना देखील लोकांपर्यंत पोहचणं सोपं होणाराय.

Sonali Deshpande
19 मे : तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. कारण आता तुम्हाला नोकरी शोधायला मदत करणाराय स्वतः गुगल. नोकरीसाठी अनेक वेबसाईट बाजारात उपलब्ध आहेत. मात्र आता स्वतः गुगल नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणाराय. यासाठी गुगल सज्ज झालंय.यापुढे नोकरी संदर्भात गुगल देखील माहिती देणाराय. त्यामुळे यापुढे गुगलवर आपण नोकरीही शोधू शकतो.यामुळे कंपन्यांना देखील लोकांपर्यंत पोहचणं सोपं होणाराय.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली. यात सर्व प्रकारच्या नोकऱ्यांची माहिती मिळणार आहे.  पिचई म्हणाले, ' अमेरिकेत अनेक कंपनी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की नोकरीसाठी योग्य बुद्धिमत्ता असलेले लोक मिळत नाहीत. आता गुगल इंजिन वापरून हे सोपं जाईल. 'या सर्च इंजिनमध्ये अनेक पर्याय आहेत. तुम्हाला नोकरीचं ठिकाण, कुठल्या प्रकारची नोकरी हवी, फुलटाइम की पार्टटाइम असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे नोकरी शोधणं सोपं होऊ शकतं.

Trending Now