काय आहेत 'आयफोन-X'चे फिचर्स?

अ‍ॅपलनं आपल्या मेगा लॉचिंग इव्हेंटमध्ये आयफोनच्या 10व्या अॅनिवर्सरीनिमित्त आयफोन-X लॉन्च केला.यात 5.8 इंचाचा एचडी सुपर अमोलेड ऑल स्क्रीन डिस्प्ले आहे, होम स्क्रीनची जागा टॅप टू वेकअप हे विशेष फिचर घेणार आहे.

Sonali Deshpande
स्नेहल पाटकर, 13 सप्टेंबर : अ‍ॅपलनं आपल्या मेगा लॉचिंग इव्हेंटमध्ये आयफोनच्या 10व्या अॅनिवर्सरीनिमित्त आयफोन-X लॉन्च केला.यात 5.8 इंचाचा एचडी सुपर अमोलेड ऑल स्क्रीन डिस्प्ले आहे, होम स्क्रीनची जागा टॅप टू वेकअप हे विशेष फिचर घेणार आहे. फेस आयडी फिचरमुळे फोन लॉक/अनलॉक करता येणार आहे. मशीन लर्निंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. यामुळे वय वाढलं तरी शरीरात बदल झाला तरी फोन लॉक/अनलॉक करण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत असे कंपनीनं स्पष्ट केलंय.फेस आयडी असणारा हा स्मार्टफोन कुणीही हॅक करू शकणार नसल्याचा दावाही अ‍ॅपलनं केलाय. फेस आयडी अ‍ॅपल पे या डिजीटल पेमेंट सिस्टिमशी ऑप्टिमाईज्ड करण्यात आलंय.आयफोन-एक्स या मॉडेलमध्ये अ‍ॅनिमोजी म्हणजेच अ‍ॅनिमेटेड इमोजी फिचर असणार आहे. 12 मेगापिक्सल्सचे ड्युअल रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यातला एक कॅमेरा f/1.4 तर दुसरा f/2.4 अपार्चरच्या सोबत असेल. विशेष म्हणजे हे दोन्ही कॅमेरे रिअरवर आडवे नाही तर उभे आहेत.ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनचे फिचर यात आहे. शिवाय रिअर आणि फ्रंट या दोन्ही कॅमेर्‍यांमध्ये पोर्ट्रेट मोड आणि पोर्ट्रेट लायटिंग फिचर आहे. यामध्ये फ्लड इल्युमिनेटर, इन्फ्रारेड कॅमेरा, फ्रंट कॅमेरा, डॉट प्रोजेक्टर, प्रॉक्झीमिटी सेन्सर, अँबिअंट लाईट सेन्सर, स्पीकर आणि मायक्रोफोन हे देण्यात आलंय. फ्लेड इल्युमिनेटर या फिचरच्या मदतीने हा कॅमेरा अंधार असताना युजरच्या चेहर्‍यावर प्रकाश पाडतो.म्हणजे अंधारात व्हिडिओ चॅटिंग शक्य आहे.

वायरलेस चार्जिंगचा सपोर्टसह असणारी आयफोन X ची बॅटरी ही आयफोन 7 प्लसपेक्षा दोन तास जास्त चालेल असा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन 64  जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आलाय. यातल्या 64 जीबी व्हेरियंटची किंमत 999 डॉलर्स आहे, आणि हा स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये उपलब्ध होणारेय.

Trending Now