'हे' आहेत आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचे धमाकेदार फिचर्स

या दोन्ही मॉडेल्सची 15 सप्टेंबरपासून नोंदणी सुरु होईल

Chittatosh Khandekar
स्नेहल पाटकर, प्रतिनिधी13 सप्टेंबर: अ‍ॅपलनं आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस या दोन नवीन स्मार्टफोन्सची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. तर  या दोन्ही मोबाईलचे काही   फिचर्स जाणून घेऊ याआयफोन 8

- 4.7 इंच एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले-6 कोअर A11 बायोनिक प्रोसेसर,-ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनसह-12 मेगापिक्सल्सचा रिअर कॅमेरा,तसंच आयफोन 8 64  आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.आयफोन 8 प्लस-5.5 इंच एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले-6 कोअर A11 बायोनिक प्रोसेसर ,-12 मेगापिक्सल्सचे ड्युअल रिअर कॅमेरे- कॅमेऱ्याचे f/1.8 अपर्चर- टेलिफोटो लेन्सचं f/2.8 अपर्चर तेही डीपर पिक्सलसोबत.याशिवाय फोर-के व्हिडीओ शूट यामधून करता येईल. तसंच अ‍ॅपल एआर किटच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी अ‍ॅप्सचा यात वापर करता येईल. आयफोन 8 प्लस 64 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. आयफोन 8 प्लस 64 जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटची किंमत 799 डॉलर्स असेल.या दोन्ही मॉडेल्सची 15 सप्टेंबरपासून नोंदणी सुरु होईल आणि अमेरिकेत 22 सप्टेंबरपासून उपलब्ध असेल.

Trending Now