जिओ फोनच्या वितरणाला आजपासून सुरूवात

60 लाखांपेक्षा जास्त लोकांनी याचं प्री-बुकिंग केलं होतं.

Chittatosh Khandekar
24 सप्टेंबर: इंडियाचा स्मार्ट फोन  जिओफोनच्या वितरणाला आजपासून सुरूवात होणार आहे. 60 लाखांपेक्षा जास्त लोकांनी याचं प्री-बुकिंग केलं होतं.हा फोन विनामुल्य असून या फोनसाठी फक्त 1500रूपयाचं डिपॉझिट भरावं लागणार आहे. हे डिपॉझिट काही कालवधीनंतर परतही मिळणार आहे. जिओ फोनचं ग्रामीण भागात आधी वितरण होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. जळगावमधील धरणगाव, वरणगाव, यवतमाळमधलं दिग्रस, बीडमधलं केज, नांदेडमधलं मुदखेड या भागात आज वितरण करण्यात येणार आहे.21 जुलैला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओफोनचं अनावरण करण्यात आलं होतं. जिओफोनसाठी अधिकृत बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरू झालं होतं. आणि आता 24 सप्टेंबरपासून या फोनचं अधिकृत वितरण सुरू होणार आहे.

Trending Now