अजब सायकल - वजन 5 किलोपेक्षा कमी,किंमत 25 लाख रुपये

सगळ्यात वेगवान कार्स बनवणाऱ्या बुगाटी कंपनीने जगातली सगळ्यात हलकी म्हणजे 5 किलोपेक्षा कमी वजनाची सायकल बनवली आहे.

Sonali Deshpande
30 मार्च : सगळ्यात वेगवान कार्स बनवणाऱ्या बुगाटी कंपनीने जगातली सगळ्यात हलकी म्हणजे 5 किलोपेक्षा कमी वजनाची सायकल बनवली आहे. पीजी बुगाटी असं या सायकलचं नाव ठेवण्यात आलं आहे. सायकल बनवणाऱ्या पीजी या जर्मन कंपनीच्या सोबत टायअप करत बुगाटीने ही सायकल बनवली आहे.काय आहे सायकलमध्ये खास?बुगाटीने या सायकलचं डिझाइन त्यांची नवी कार कायरॉनारखं बनवलं आहे. या सायकलला सिंगल ब्रेक आणि सिंगल चेन आहे. या आकर्षक सायकलची किंमत आहे 39000 डॉलर्स म्हणजेच 25 लाख रुपये.

'एक खास सायकल एक खास कार जैसी' अशी या सायकलची टॅगलाईन आहे. कंपनी अशा फक्त 667 सायकल्स बनवणार आहे, पण ती मार्केटमध्ये कधी येणार हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.ही सायकल कार्बन फायबरपासून बनवण्यात आली आहे. या सायकलचं वजन कमी ठेवण्यासाठी यात प्रीप्रेग हे मटेरिअल वापरण्यात आलं आहे. मोटर स्पोर्टस, विमानं यात हे मटेरियल वापरलं जातं.

Trending Now