अॅपल आणतोय छोट्या स्क्रीनचा स्मार्टफोन

अॅपल आयफोन 'SE'चं नवं मॉडल मार्केटमध्ये येणार आहे. 'आयफोन SE 2' असं या नव्या फोनचं नाव असू शकतं. 2018च्या जानेवारीपर्यंत हा फोन आपल्या भेटीला येऊ शकतो.

Sonali Deshpande
27 नोव्हेंबर : लहान स्क्रीनचा फोन आवडणाऱ्यांसाठी आता अॅपल लवकरच एक नवं मॉडल लाँच करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे नवं मॉडेल पहिल्यांदा भारतात लाँच करण्यात येणार आहे. अॅपल आयफोन 'SE'चं नवं मॉडल मार्केटमध्ये येणार आहे. 'आयफोन SE 2' असं या नव्या फोनचं नाव असू शकतं. 2018च्या जानेवारीपर्यंत हा फोन आपल्या भेटीला येऊ शकतो.चीन मीडियाच्या रिपोर्टनुसार हा नवीन फोन आयफोन SEचा रिप्लेसमेंट असणार आहे. जो खास लहान स्क्रीन आवडणाऱ्या युजर्ससाठी बनवण्यात येणार आहे. या नव्या फोनची किंमत 29000 पर्यंत असू शकते.'आयफोन SE 2'ची वैशिष्ट्यं

- या फोनला 4 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. हा इतर फोन सारखाच अपडेटेड असणार आहे.- हा फोन आयफोन 7 आणि आयफोन 8 पेक्षा 4.7 इंचाने लहान आहे.- या फोनमध्ये आयफोन 7 आणि 7 प्लसमधल्या फ्युजन चिप वापरण्यात आल्या आहेत.- या फोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB ते 128GB रॉम असणार आहे.- 12 मेगा पिक्सल रेअर कॅमेरा तर 5 मेगा पिक्सल फ्रोन्ट कॅमेरा असणार आहे.- या फोनमध्ये 1700एमएएच बॅटरी दिली गेली आहे.हा फोन तैवानचे मूळ डिझाइन उत्पादक (ओडीएम) विस्टेरन यांच्या बंगरूळच्या कारखान्यात बनवण्यात येणार आहे. याधीचा आयफोन SEसुद्धा त्यांच्याच कारखान्यात बनवण्यात आला आहे.

Trending Now