आयफोन 8 आणि 8 प्लस लाँच, हे आहेत फिचर्स आणि किंमत

कॅलिफोर्नियातील अॅपलच्या नव्या कॅम्पसमध्ये दिमाखदार सोहळ्यात आयफोन 8, 8 प्लॅस, अॅपल वाॅच आणि अॅपल टीव्हीची घोषणा करण्यात आलीये.

Sachin Salve
12 सप्टेंबर : येणार...येणार म्हणत अखेर अॅपलचा बहुप्रतिक्षित आयफोन 8 आणि 8 प्लस लाँच झालाय. कॅलिफोर्नियातील अॅपलच्या नव्या कॅम्पसमध्ये दिमाखदार सोहळ्यात आयफोन 8, 8 प्लॅस, अॅपल वाॅच आणि अॅपल टीव्हीची घोषणा करण्यात आलीये.कॅलिफोर्नियातील कुपेरटिनोमध्ये अॅपलच्या नव्या कॅम्पसच्या स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये बहुप्रतिक्षित सोहळा सुरू झाला आणि अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले. अॅपलने आपल्या पिटाऱ्यातून नवनवीन घोषणा करत आयफोनसोबतच LTE सर्पोट असलेला अॅपल वॉच सीरिज ३ आणि 4 k अॅपल टीव्ही सेट टॉप बॉक्सही लाँच केलाय.विशेष म्हणजे, आयफोन मालिकेचा हा 10 वर्धापन आहे. त्यामुळे आयफोनसाठी आज दिवस खास होता. आयफोन 8 (64GB/256GB) 699 डाॅलर भारतीय चलनात 44,747 किंमत असणार आहे. तर  आयफोन 8 प्लस (64GB/256GB) ची किंमत ही 799 डाॅलर, भारतीय चलनात 51,147 इतकी किंमत असणार आहे.

अमेरिकेत प्री-बुकिंग 15 सप्टेंबरपासून सुरू होणार तर 22 सप्टेंबरपासून विक्री सुरू होणार आहे.काय आहे नव्या घोषणाफोटो क्वालिटीसाठी  iPhone 8 प्लसमध्ये पोर्ट्रेट लाईटिंग मोड iPhone 8 ची स्क्रीन 4.5 इंच iPhone 8 plus ची स्क्रीन  5.5 इंच Apple 4K TV लाँच, मध्ये गेमिंगचं नवं व्हर्जन अॅपल वाॅच 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार अॅपल वाॅचमध्ये 40 मिलियन गाणे स्ट्रीम होणार

Trending Now