टोयोटाची सिडेन कार 'यारिस' भारतात लॉन्च! पहा काय आहे खासियत

टोयोटा कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षीत मध्यम आकाराची सिडेन यारिस ही कार बुधवारी भारतात लॉन्च केली. या आकर्षक कारचे 4 व्हेरिएंट भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.

Renuka Dhaybar
26 एप्रिल : टोयोटा कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षीत मध्यम आकाराची सिडेन यारिस ही कार बुधवारी भारतात लॉन्च केली. या आकर्षक कारचे 4 व्हेरिएंट भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.सध्या ग्राहक ही कार 50 हजार रुपये देऊन बुक करु शकतात. यारिस या कारची किंमत 8.5 लाख रुपयांपासून सुरु होते. ही केवळ पेट्रोल इंजिनची किंमत आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 14.07 लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे.ही कार आकर्षक 6 रंगांमध्ये मिळणार आहे. टोयोटाने ही कार 4 व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. यात मॅन्यूअल आणि सीवीटी ऑटोमॅटीक दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

काय आहे खासियत?या कारच्या टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टीममध्ये गेस्चर कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टम असे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चारही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यासोबतच कारमध्ये 7 एअरबॅग्स, हिल स्टार्ट असिस्ट, एबीएससारखे फिचर्स देण्यात आले आहेत.वेगवेगळ्या व्हेरियंटची किंमतमॅन्यूअल ट्रान्समिशन सीवीटी ऑटोमॅटिकJ Rs 8,75,000/       -      Rs 9,95,000/-G Rs 10,56,000/    -   Rs 11,76,000/-V Rs 11,70,000/     -    Rs 12,90,000/-VX Rs 12,85,000/ -  Rs 14,07,000/- 

Trending Now