एअरटेल कंपनीच्या जाहिराती खोट्या, हायकोर्टाचा निर्णय

एअरटेलच्या या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत जिओनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टानं जिओच्या बाजूनं निर्णय दिला आहे.

Renuka Dhaybar
14 एप्रिल : एअरटेल कंपनीला दिल्ली हायकोर्टानं चपराक लगावली आहे. एअरटेलच्या ग्राहकांना एक विशिष्ठ प्लॅन घेतल्यामुळे मोबाईलवर आयपीएलचे सामने मोफत पाहता येतील, अशी जाहिरात करणं चुकीचं आहे, असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिला.एअरटेलच्या या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत जिओनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टानं जिओच्या बाजूनं निर्णय दिला आहे. एअरटेल आता त्यांच्या जाहिरातीत बदल करणार आहे.पाहूयात नेमकं हे प्रकरण काय आहे ते...

- क्रिकेट सीझन पॅकबाबत एअरटेलची दिशाभूल करणारी जाहिरात- प्लॅन घेतल्यावर IPLचे सामने मोफत पाहता येतील - एअरटेल- पण डेटाचे पैसे भरावेच लागतील, हे जाहिरातीत सांगितलं नाही- जिओनं ही बाब कोर्टाच्या लक्षात आणून दिली- एअरटेलची जाहिरीत चुकीची, कोर्टाचा निर्णय- जाहिरातीत बदल करू, एअरटेलचं कोर्टाला आश्वासन 

Trending Now