पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकून ‘या’ खेळाडूने केली सेहवागची बरोबरी

त्याने कोणत्याही गोलंदाजाला न जुमानता अर्धशतकीय खेळी केली

इंग्लडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटीमध्ये भारतीय संघात हनुमा विहारी हा नवा खेळाडू सहभागी झाला. विहारीने त्याच्या या डेब्यु मॅचमध्ये शानदार अर्धशतक ठोकलं. विहारीने पहिल्याच सामन्यात १२४ चेंडूत ५६ धावा ठोकल्या. पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक ठोकून हनुमाने त्याच्या कसोटी कारकिर्दीतला पहिला विक्रम नोंदवला.

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने २००१ मध्ये उपखंडाबाहेरील संघांच्या डेब्यु सामन्यात अर्धशतक ठोकले होते. १८ वर्षांनंतर विहारीने सेहवागच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे. इंग्लडविरुद्धच्या कसोटीमध्ये सौरव गांगुली आणि राहुल द्रविडनंतर विहारी हा डेब्यु मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारा भारतीय खेळाडू ठरलाय. विहारी हा मिडल ऑर्डरचा फलंदाज असूनदेखील त्याने हा विक्रम केला. यासाठी त्याचे कौतुक केले जात आहे. सुरूवातीच्या काही चेंडूंचा सामना करताना तो थोडा डगमगला. पण नंतर त्याने कोणत्याही गोलंदाजाला न जुमानता अर्धशतकीय खेळी केली.

Trending Now