वीरेंद्र सेहवागचे हे ‘फनी’ फोटो पाहिलेत का?

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत असतो. त्याने टाकलेले प्रत्येक फोटो सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होतात. हाताने हृदयाचं चिन्ह दाखवणाऱ्या या फोटोला सेहवागने कॅप्शन देताना म्हटले की, ‘नेहमीच मनापासून’ सेहवागच्या या फोटोला सव्वा लाखाहून जास्त लाइक आले आहेत. वीरू या फोटोमध्ये योगा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा फोटोही त्याच्या चाहत्यांना फार आवडला. एका चाहत्याने फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, आपले वीरू पाजी सर्वांपेक्षा वेगळे आहेत आणि त्यांचा अंदाजही वेगळा आहे. सेहवागने काही दिवसांपूर्वी त्याचा जुना फोटो शेअर केला होता.

वीरु त्याच्या फोटोंसाठी जेवढा चर्चेत असतो तेवढाच त्यावरील कॅप्शनसाठीही त्याचे अनेकदा कौतुक होते. काही दिवसांपूर्वी त्याने फिफा वर्ल्ड कपमधील एक सामना पाहिल्यानंतर हा फोटो शेअर केला. या फोटोत त्याने क्रोएशियाला उद्देशून मेसेज केला होता. सेहवागचा हा फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता. या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, जे’ रोज भेटत नाही त्यांच्यासाठी एक रोज’ काही महिन्यांपूर्वी त्याने स्वतःचा फ्लाईटमध्ये झोपलेला फोटो शेअर करत म्हटले की, ‘जी मजा झोपण्यात आहे ती कोणत्याही कोपऱ्यात नाही.’ वीरेंद्र सेहवाग फार रोमँटिकही आहे. तो बायकोसोबतचे फोटो अनेकदा शेअर करतो.

Trending Now