VIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय?

इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात वीरधवल खाडे अंतिम फेरीत पोहोचला. भारतीय वेळेनुसार त्याचा हा अंतिम सामना संध्याकाळी ४.३० वाजता पाहता येणार आहे. भारताचा अनुभवी खेळाडू म्हणून वीरधवलकडे पाहिले जाते. दरम्यान, अंतीम सामन्याला जाण्यापूर्वी वीरधवलने त्याच्या मनातील भावना नेटवर्क १८ च्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवल्या. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी नेमबाजी प्रकारात भारताने दोन पदकं पटकावली. १६ वर्षीय सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले तर याच प्रकारात अभिषेक वर्माला कांस्य पदक मिळाले.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now