काय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल?

नुकत्याच एका मुलाखतीत विराटनं बरीच गुपितं उघडलेत. त्याला आॅफ फिल्ड कॅप्टन कोण असं विचारलं असता तो क्षणाचाही विचार न करता म्हणाला, अनुष्का.

Sonali Deshpande
२४ मे : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं लग्न झालं आणि संसार सुरू झाला. हे पाॅवर कपल नेहमीच चर्चेत असतं. नुकत्याच एका मुलाखतीत विराटनं बरीच गुपितं उघडलेत. त्याला आॅफ फिल्ड कॅप्टन कोण असं विचारलं असता तो क्षणाचाही विचार न करता म्हणाला, अनुष्का.'अनुष्काला भेटल्यावर माझं आयुष्यच बदललं. मी शांत कसं राहायचं हे तिच्याकडून शिकलो. ती खूप पाॅझिटिव्ह आहे. तिचे निर्णय अचूक असतात.' विराट अनुष्काचं कौतुक करताना अजिबात दमत नाही.आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल सांगताना तो म्हणाला, 'आम्हा दोघांची अशी इच्छा आहे की घरात मुलांसमोर माझ्या करियरमधली कुठलीच ट्राॅफी ठेवणार नाही. आमचं सेलिब्रिटी स्टेटस मुलांच्या समोर असायला नको.'

Trending Now