टेंन्शनमध्ये आहे विराट कोहली, घेऊ शकतो हे मोठे निर्णय

इग्लंडच्या भूमित मालिका जिंकण्याच्या कोहलीच्या स्वप्नाला मोठा सुरूंग लागला आहे. पहिलाच कसोटी सामन्यात टीम इंडियाचा ३१ धावांनी पराभव झाला. पाच कसोटी सामन्यांपैकी पहिला सामना भारत हारल्यानंतर ९ ऑगस्टला सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीला मोठे बदल करावे लागू शकतात. कोहली अनेकदा प्रत्येक सामन्यातील संघात बदल करत असतो. असं म्हंटलं जातं की येणाऱ्या सामन्यातदेखील काही खेळाडू बदलण्यात येणार आहेत.

९ ऑगस्टला सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलऐवजी चेतेश्वर पुजाराला संधी दिली जाऊ शकते. केएल राहुलसोबत अजिंक्य रहाणेची नाराज खेळी देखील संघासाठी चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे त्याच्या जागी करुण नायरला संधी मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याची गोलंदाजी पण तितकी कमाल करू शकली नसल्याने त्याच्या जागी अष्टपैलू रविंद्र जडेजाला संधी मिळू शकते. दिनेश कार्तिकनेही या सामन्यात काही खास खेळला नाही. त्यामुळे त्याच्या जागी ऋषभ पंतला संघात जागा मिळू शकते. पण दिनेश कार्तिकला बाहेर काढणं हे कर्णधार विराट कोहलीसाठी एक चिंतेची बाब ठरू शकते.​

Trending Now