विराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण

इंग्लंडविरुद्ध तीसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने सहा विकेट गमावून 307 धावा केल्या. भारतीय खेळाडू पहिल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी करू शकले नसल्याने तीसऱ्या सामन्यात भारताच्या कर्णधार आणि उपकर्णधारने संपूर्ण धूरा सांभाळली. कर्णधार विराट कोहलीने 97 धावा केल्या तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 81 धावे केल्या.

विराटला शतक बनवण्यासाठी फक्त तीन धावांची गरज होती पण त्या आधीच तो बाद झाला. त्याच्या आयुष्यात असं दुसऱ्यांदा घडलंय की तो 90 आकडा पार करुन बाद झाला आहे. या आधी 2013मध्ये झालेल्या जोहान्सबर्गमधील कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 96 धावा केल्या होत्या.
कोहलीने यापूर्वी 17 सामन्यांमध्ये जेव्हा 90चा आकडा पार केला तेव्हा त्याने शतकच ठोकले आहे. 

Trending Now