कोहलीने घेतला आश्चर्यकारक निर्णय, मग असा झाला चमत्कार!

भारत आणि इंग्लंडमध्ये आजपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात विराटने आपल्या निर्णयाने इंग्लंड संघाला बुचकळ्यात पाडले. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या काही ओव्हरमध्ये भारताला इंग्लंडचा एकही गडी बाद करता आला नाही.

सामन्याच्या सातव्या ओव्हरमध्ये कोहलीने सगळ्यांना हैराण करत अश्विनला गोलंदाजी करण्याची संधी दिली अश्विननेही कर्णधार कोहलीचा विश्वास फोल ठरवला नाही. त्याने दुसऱ्याच ओव्हरमध्ये अलिस्टर कूकला १३ धावांमध्ये बाद केले. आतापर्यंत अश्विनने कूकला कसोटी सामन्यात आठवेळा बाद केले आहे.

Trending Now