आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी

इंग्लंडने भारताला पहिल्या सामन्यात ३१ धावांनी हरवले. भारताने हा पहिला सामना जरी हरला असला तरी कोहलीने मात्र त्याच्या नावे एक विक्रम नोंदवला आहे. आयसीसी कसोटी यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मितला मागे टाकत हा विक्रम केला आहे. तब्बल ३२ महिने वाट पाहिल्यानंतर एजबेस्टनमध्ये झालेल्या भारत- इंग्लंडने कसोटी सामन्यात विराटने हा विक्रम मोडला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कोहलीने पहिल्या डावात १४९ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्याने ५१ धावा करत एकहाती किल्ला लढवला होता.

Trending Now